बीड – नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांने घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून त्याने 502 वी रँक मिळवली आहे. संपूर्ण तालुक्यातून यशवंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही त्याचे कौतुक केले असून त्याच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे म्हंटले आहे.
आमच्या परळीतील यशवंत अभिमन्यू मुंडे याने
स्वयं-अध्यनावर भर देत, यूपीएससी परीक्षेत 502 रँक मिळवत कुटुंबाचे क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.जगमित्र नागा विद्यालयातील निवृत्त शिक्षक अभिमन्यू मुंडे सर यांना यशवंतचा जितका अभिमान आहे तितकाच मलाही आहे! Proud of you Yashwant! pic.twitter.com/PhB1pfp1lQ— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 24, 2021
विशेष म्हणजे ये यश संपादन करण्यासाठी त्याने कुठलाही क्लास लावला नसल्याचे तो सांगतो. यशंवत म्हणतो, मी अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा असून माझे वडील निवृत्त क्रीडा शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परळीत झाल्यानंतर लातूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दररोज 10 तास अभ्यास करत होतो. कुठलेही क्लास लावला नाही. तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलेही उद्दिष्ट अशक्य नाही. इतरांकडून तर प्रेरणा घ्याच पण आत्मप्रेरणा आणि अभ्यासाच्या बाबतची निष्ठा प्रामाणिक असली पाहिजे असे यशवंत सांगतो.
ग्रामीण भागातील मुलांचे अधिकारी होण्याचे प्रमाण कमी असले तरी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर जागृती होऊ लागली असून, मुले अधिकारी होऊ लागले आहेत. या गोष्टीचे आपल्याला अत्यंत समाधान असल्याची भावना यशवंत मुंडेंनी व्यक्त केली.
राज्यातील इतर यशस्वी विद्यार्थी आणि रॅंक
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभिषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455), अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476), श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646) ,सुबोध मानकर (648) ,शिवहार मोरे (649) ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749).