यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; बिहारचा शुभम कुमार देशात पहिला

देशातील 761 उमेदवार उत्तीर्ण, 21 वर्षीय नितीशा जगताप पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

पुणे –  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून देशात पहिला क्रमांक बिहारच्या शुभम कुमारने मिळविला आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात 36 वी आली आहे.

सन 2020 मध्ये यूपीएससीकडून परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. नियमाप्रमाणे वेबसाइटवर आत्ता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र 15 दिवसांत अपलोड करण्यात येणार आहे. शुभम कुमार हा आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक. सिव्हील इंजिनिअर आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे तर अंकिता जैनने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. 24 वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंग केले आहे. महाराष्ट्राचा विनायक नरवदे देशात 37 वा आला आहे. 95व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी खुल्या प्रवर्गातील 263 आहेत. ईडब्लूएसमधून 86, ओबीसीमधून 229, एससीमधून 122, एसटीमधून 61 उमेदवारांचा समावेश आहे. याशिवाय 150 उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. यात खुल्या प्रवर्गातील 75, ईडब्लूएसच्या 14, ओबीसीमधून 55, एससीमधून 5, एसटीमधून 1 या प्रमाणे उमेदवारांचा समावेश आहे.

आयएएससाठी 180, आयएफएससाठी 36, आयपीएससाठी 200, सेंट्रल सिव्हील ग्रप ए मध्ये-302, ग्रुप बी सर्व्हिससाठी 118 याप्रमाणे 836 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी परीक्षा झाली होती. उत्तीर्ण झालेल्यामध्ये 545 पुरुष तर 216 महिलांचा समावेश आहे. पहिल्या 25 मध्ये 13 पुरुष व 12 महिलांचा समावेश आहे.

कसबा पेठेतील पार्थ देशात 174 वा, पूजा कदमचे “नेत्रदीपक’ यश
21 वर्षीय नितीशा जगताप पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. पुण्यातील कसबा पेठेतील पार्थ जगदीश कश्‍यप याने देशात 174 वा क्रमांक िंमळविला आहे. पुण्यातील अंध उमेदवार पूजा कदम हिने 577 वी रॅंक मिळवली आहे. 21 वर्षांची नितीशा जगताप पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली असून तीने 199 क्रमांक मिळविला आहे. लातूर येथील निलेश गायकवाड हा 629 रॅंकने उत्तीर्ण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील शिंदेवाडी येथील शुभम जाधव याने 445 रॅंक मिळवून यश मिळवले आहे. लातूरमधील कमलकिशोर कांदरकरने 137, यवतमाळच्या दर्शन दुगडने 138 वा क्रमांक मिळविला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.