Upendra Limaye | अभिनेते उपेंद्र लिमये यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील दमदार अभिनय केला आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटातील फ्रेडी पाटील या त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. यानंतर ते एका तेलूगु चित्रपटात काम करणार आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीसोबत ते स्क्रीन शेअर करणार आहेत. उपेंद्र लिमयेंची महत्त्वाची भूमिका असणारा पहिला तेलुगू चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भातील व्हिडीओ उपेंद्र यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यात उपेंद्र लिमये सांगतात की, “नमस्कार, हा माझा पहिला तेलुगू ‘संक्रांतिकी वास्तुनम’ नावाचा व्यावसायिक चित्रपट आहे. या चित्रपटाचं शूटिंग काल संपले आणि आज मी या चित्रपटाचं डबिंग सुद्धा संपवलं आहे. इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये कधीही शूटिंग संपवून, लगेच आज डबिंग पूर्ण झालंय, असं झालेलं नाही. पहिल्यांदाच असं झालंय आणि हा एक अत्यंत समृद्ध करणारा व्यावसायिक अनुभव मिळाला. मला ही संधी दाक्षिणात्य लेखक-दिग्दर्शक अनिल रवीपुडी यांच्यामुळे मिळाली. तेलुगू इंडस्ट्री मधील ब्लॉकबस्टर लेखक-दिग्दर्शक अशी यांची ओळख आहे. सर, तुमचे खूप आभार तुमच्याबरोबर काम करताना खूप मजा आली.” Upendra Limaye |
View this post on Instagram
पुढे दिग्दर्शक अनिल म्हणतात की, “उपेंद्र सरांबरोबर काम करून खूपच भारी वाटलं. हे किती उत्तम कलाकार आहेत हे मी शब्दात सांगूही शकत नाही. कोणतीही भूमिका ते अगदी सहज साकारू शकतात. त्यांचं टायमिंग कमाल आहे. सकाळी त्यांनी डबिंग सुरू केलं होतं आणि आता रात्रीचे १० वाजले. एवढा वेळ त्यांनी डबिंगसाठी काम केलंय. त्यांचं डेडिकेशन कमालीचं आहे. शिस्त, वेळेवर येणं, त्यांचं सगळं काही परफेक्ट असतं. या चित्रपटामध्ये तुम्हाला उपेंद्र सरांची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल,” असे म्हणत त्यांनी उपेंद्र लिमये यांचे कौतुक केले. दरम्यान, संक्रांतिकी वास्तुनम हा चित्रपट येत्या 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. Upendra Limaye |
उपेंद्रच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘ॲनिमल’ नंतर ‘मडगाव एक्सप्रेस’ हा त्याचा नवा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात त्याने मेंडोझा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. तो शेवटचा ‘कर्म विरायण’ या मराठी चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याने ‘माय नेम इज 340’, ‘डार्लिंग’, ‘चांदनी बार’ आणि ‘पेज 3’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘तारा फ्रॉम सातारा’ या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.
हेही वाचा:
‘बांगलादेशात सर्व वयोगटातील महिलांवर अत्याचार…’ ; हिंदूंवरील हल्ल्यांवर साध्वी ऋतंभरा यांचा संतप्त