मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करण्याच्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज असल्याचे वृत्त होते. परंतु, युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही, असे म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले कि, काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. तर युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते.
सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचे नेतृत्व खंबीरपणे केले आहे, पण सध्या त्यांची प्रकृती ठीक नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे,
तसेच, देशात भाजपप्रणित एनडीएसमोर काँग्रेसप्रणित युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहेत. मात्र, आता युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.