यू पी योध्दा विरूध्द हरयाणा स्टीलर्स
स्थळ – अहमदाबाद
वेळ – रात्री 7.30 वा.
अहमदाबाद – बंगळुरू बुल्स संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या यु पी योद्धापुढे हरयाणा स्टीलर्स संघाची आज कसोटी ठरणार आहे. हा सामना रंगतदार होतील अशी अपेक्षा आहे.
बंगळुरूविरुद्धच्या विजयामुळे योद्धा संघाच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचा फायदा त्यांना आज मिळेल अशी आशा आहे. आतापर्यंत त्यांनी सात सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. विजयाचे सातत्य मिळविण्यासाठी त्यांना सांघिक कौशल्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
हरयाणा संघाकडेही गुणवान खेळाडू आहेत. मात्र, त्यांनी चढाया व पकडींमध्ये होणाऱ्या अक्षम्य चुका टाळल्या पाहिजेत. तसेच शेवटपर्यंत खेळावर नियंत्रण ठेवण्यावरही त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
यू पी योद्धा :
बलस्थाने – युवा व अनुभवी खेळाडूंचा समतोल, खोलवर चढाया करण्यात माहीर.
कच्चे दुवे – चढाया व पकडींमध्ये अक्षम्य चुका, खेळावर नियंत्रणाचा अभाव.
हरयाणा स्टीलर्स :
बलस्थाने – ताकदवान खेळाबाबत माहीर, भक्कम पकडी हेच विजयाचे सूत्र.
कच्चे दुवे – चढायांमध्ये घिसाडघाई, पकडींमध्ये नकळत होणाऱ्या चुका.