सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय फिरणाऱ्या ८५ नागरिकांवर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय फिरणाऱ्यांवर पालीकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या ८५ नागरिकांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा २४ वर पोहचला आहे, तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 
तसेच कोरोना विषाणूबरोबरच औरंगाबादेत ‘सारी’ आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. या सारी आजारामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आणि सारी आजाराचे लक्षणे सारखेच असल्यामुळे नेमका कोणता आजार झाला हे लक्षात येत नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकर ‘सारी’ आजारावर उपचार शोधून काढावे लागतील असे म्हटले आहे. 
औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आजाराची दाखल घेऊन आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी औरंगाबादमध्ये स्वतंत्र रुग्णालय सुरु करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे. सुभाष देसाई यांनी सोमवारी हा निर्णय जाहीर केल्याचे औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत औरंगाबादेत २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग, आणि पालिकेचे अधिकारी सतर्क झाले आहेत. ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तो परिसर सील करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.