पुणे : कृष्णा राजाराम अष्टेकर आयोजित केआरए ज्वेलर्सतर्फे सादर झालेल्या विवाह कलेक्शन अंतर्गत बांगड्या व नेकलेसच्या घडणावळीवर २५% पर्यंत सूट असणार असल्याची माहिती केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर यांनी दिली आहे. ही योजना येत्या ३० मार्चपर्यंत असेल असेही ते यावेळी म्हणाले.
याविषयी अधिक माहिती देताना अतुल अष्टेकर पुढे म्हणाले, “सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या काळात केआरए ज्वेलर्सचे विवाह कलेक्शन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. लग्न तसेच इतर सण-समारंभामध्ये सौभाग्य अलंकार म्हणून मांगळसूत्रासोबत नेकलेस आणि बांगड्यांना विशेष महत्त्व असते. त्याच उद्देशाने आम्ही नेकलेस आणि बांगड्यांच्या घडणावळीवरही सूट देत आहोत. ग्राहकांना मांगळसूत्रास साजेसे बांगड्या आणि नेकलेससाठी ट्रेंडी डिझाइन्स हवे असून ही गरज लक्षात घेत आम्ही त्यामध्ये असंख्य नवे डिझाइन्स सादर करत आहोत.”
टेंपल, अँटिक, कुंदन आदी प्रकारांतील बांगड्या आणि नेकलेसच्या लेटेस्ट डिझाइन्स केआरए ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये नेकलेस, मांगळसूत्र, बांगड्या, अंगठी, कानातले अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. त्यापैकी बांगड्या आणि नेकलेस यांच्या घडणावळीवर ३० मार्चपर्यंत २५% पर्यंत सूट दिली जाणार असल्याचेही अष्टेकर म्हणाले. ग्राहकांना या आकर्षक योजनेचा लाभ केआरए ज्वेलर्सच्या सोयीसुविधांनी सुसज्ज सर्व शाखांमध्ये घेता येईल.