आगामी सणांसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान सुट्टी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस महासंचालक मुकुल गोयल यांनी रजा रद्द करण्याचा आदेश लागू केला आहे.
डीजीपी मुकुल गोयल यांच्या वतीने सर्व डीजी, एडीजी, पोलिस आयुक्त आणि एसएसपी रेल्वे यांना पत्र लिहून हा आदेश पारित करण्यात आला आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर 16 ते 20 मार्च या कालावधीत राज्यभरातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रजेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यांना विशेष परिस्थितीत रजा देण्याची तरतूद आदेशात करण्यात आली आहे.