लखनौ – उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या 36 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय नोंदवला आहे. भाजपच्या खात्यात 36 पैकी 33 जागा आल्या. भाजपला विधान परिषदेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. सपाला एकही जागा जिंकता आली नाही. तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले.
समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्ये अपक्ष विक्रांत सिंह विजयी झाले. तर भारतीय जनता पक्षाला त्यांचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.