नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील संभलमधील ही वक्ती असल्याचे पोलीसांनी माहिती देताना सांगितले आहे. या व्यक्तीने सोशल मिडियावर पंतप्रधान मोदीं यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील संभलच्या फतेहगढ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, फतेहगढ पोलिस स्टेशन हद्दीतील दारणी गावातील इरफान हुसेन नावाच्या तरुणाने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भारतीय जनता पार्टीच्या नेते प्रवीण कुमार व कार्यकर्त्यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.