आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 125 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ४० टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. महिलांच्या नावांची घोषणा करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, या सर्व महिला संघर्ष करणार आहेत. महत्वाचे म्हणजे काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा देवी यांनाही तिकीट दिले आहे.
Congress leader Priyanka Gandhi Vadra releases party's first list of 125 candidates for Uttar Pradesh polls
"Out of the total 125 candidates, 40% are women & 40% are the youth. With this historic initiative, we hope to bring in a new kind of politics in the sate," she says pic.twitter.com/qg8pJQrlri
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
125 उमेदवारांच्या यादीत 50 महिला
पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी म्हणाल्या, “125 उमेदवारांच्या यादीत 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावेत, असा आमचा प्रयत्न आहे.”
पुढे त्या म्हणाल्या की, “पहिल्या यादीत 40 टक्के तरुणांनाही तिकिटे देण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही यूपीच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू असा आमचा प्रयत्न आहे. असा विश्वास यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला आहे.
प्रियंका पुढे माहिती देताना म्हणाल्या, या यादीत काही महिला पत्रकार आहेत. एक अभिनेत्री आहे आणि बाकीच्या संघर्षशील महिला आहेत. ज्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे संघर्ष केला. “पक्षाने महिला उमेदवारांची जिंकण्याची आणि लढण्याची क्षमता पाहून त्यांची निवड केली आहे. आज यूपीमध्ये हुकूमशाही सरकार आहे. ह्या समस्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.