लखनौ – उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर इतर पक्षही आघाडीवर आहेत. त्यातच आता भाजपने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये २० आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजपने एकूण १०५ आमदारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची नावं या यादीत सामील कऱण्यात आलेले आहेत. दरम्यान भाजपकडून जाहीर केलेल्या यादीनुसार विद्यमान 20 आमदारांचा पत्ता कट करण्यता आला आहे.
10 seats for women, 44 seats for OBC candidates and 19 seats for SC, in upcoming assembly polls: BJP pic.twitter.com/3S7OtIQjhB
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 15, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पहिल्या टप्प्यातील 48 तर दुसऱ्या टप्प्यातील 57 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं.
उमेदवारांच्या यादीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. आदित्यनाथ त्यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.