हंदवाडा चकमक : उत्तर प्रदेशातल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये जम्मू काश्मीरच्या 2 पोलिसांसह सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले आहेत.

शहीद झालेले जवान उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. शहीद जवान विनोद कुमार आणि श्याम यादव या दोघांच्याही कुटुंबीयांना उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून 25-25 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)