बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले गेले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना बुलंदशहर येथून अलीगढला उपचासाठी दाखळ करण्यात आले आहे. बुलंदशहरच्या डिबाई तहसीलच्या मागे असलेल्या सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हा सिलेंडरचा स्फोट झाला आहे.
शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात ठेवलेला 5 किलोचा गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. तेथे उपस्थित असलेल्या 10 विद्यार्थ्यांसह 13 जण या स्फोटात होरपळे असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुलंदशहरचे डीएम सीपी सिंह म्हणाले, “आज 9 वाजण्याच्या सुमारास पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जेवण बनवत असताना एका लहान सिलेंडरला आग लागली आणि त्यानंतर त्याचा स्फोट झाला. या अपघातात पॉलिटेक्निकची 10 मुले जखमी झाली असून, त्यांना अलीगढच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.