उत्तर प्रदेश : अटलजींच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमादरम्यान बोट पलटली

मंत्री, खासदार आणि आमदार नदीत पडले

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे विसर्जन दरम्यान शनिवारी सांयकाळी बस्ती या गावातील कुआनो नदीवरील अमहट घाटावर बोट पलटी झाली. बोटीमध्ये राज्यमंत्री सुरेश पासी, भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष रमापति राम त्रिपाठी, खासदार हरीश व्दिवेदी, चार आमदार आणि एसपी दिलीप कुमार यांच्यासह १७ जण बोटीत उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोटीत आधीच काही मंत्री आणि आमदार, खासदार उपस्थित होते. बोट पाण्यावर चालू लागताच काही १०-१२ कार्यकर्ते बोटीत चढले. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने आणि आणखी लोक चढल्याने बोटीचे संतुलन बिघडल्याने बोट पलटी झाली आणि बोटीतील सर्व कुआनो नदीत पडले.

ही घटना घडताच त्याठिकाणी धावपळ सुरू झाली पण तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी आणि स्थानिक लोकांनी ही घटना घडताच प्रसंगवधान दाखवत सर्वांना नदीच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)