UP: बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी ATSची मोठी कारवाई, मौलाना उमर गौतमच्या मुलाला अटक

नवी दिल्ली – बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. मौलाना उमर गौतम याचा मुलगा अब्दुल्ला याला यूपी एटीएसने अटक केली आहे. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात पहिल्यांदा उमर गौतमला अटक करण्यात आली होती. यूपी एटीएस या प्रकरणी सातत्याने कारवाई करत असून, आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

– धर्मांतराचे मोठे रॅकेट

धर्मांतर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मौलाना उमर गौतमचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. धर्मांतरासाठी देशभरात 60 हून अधिक केंद्रे चालवली जात आहेत, ज्याचे नेटवर्क यूपी, दिल्ली, हरियाणा येथे असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातही या रॅकेटचा सापळा आहे. मूक जिहादच्या नावाखाली धर्मांतर केले जात आहे. मौलाना उमरच्या अटकेनंतर यूपी एटीएस अब्दुल्लाचा शोध घेत होती. अखेर आज त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

– आयएसआयकडून फंडिंग

दरम्यान, बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर कसे केले जाते, हे उघड केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेले मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी यांनी गेल्या वर्षभरात विदेशी फंडिंग आणि आयएसआय फंडिंगच्या मदतीने 350 लोकांचे धर्मांतर केले असून, आतापर्यंत एकूण 1000 लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यूपी एटीएसच्या चौकशीदरम्यान समोर आले आहे की जबरदस्तीने धर्मांतराचे धागेदोरे सीमेपलीकडून जोडलेले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.