हैद्राबाद – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज हैद्राबाद पोलिसांनी इन्काउंटर केला. या घटनेसंदर्भात बोलताना उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या हैदराबाद पोलिसांनी जे काम केल ते कौतुकास पात्र आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैद्राबाद पोलिसांचा आदर्श घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Mayawati: Crimes against women are on the rise in Uttar Pradesh, but the state government is sleeping.Police here and also in Delhi should take inspiration from Hyderabad Police,but unfortunately here criminals are treated like state guests, there is jungle raj in UP right now pic.twitter.com/KeN53KCV4A
— ANI UP (@ANINewsUP) December 6, 2019
मायावती म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, राज्य सरकार झोपल आहे. उत्तर प्रेदश आणि दिल्ली पोलिसांनी हैद्राबादच्या पोलिसांकडून काहीतरी शिकायला हवं. मात्र, दुर्देव आहे की उत्तर प्रदेशातील आरोपींना राज्यातील प्रमुख पाहुणे असल्यासारखी वागणूक दिली जाते. दरम्यान, उत्तर प्रेदशमध्ये सध्या जंगल राज सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.