जलौन – दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नेत्याकडे जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपच्या तपासणीत त्याने आणखी नऊ मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्यात सात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांना शोधून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरूअसल्याचे कोंच पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार इम्रान खान यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचा कोंच विभागाचा माजी उपाध्यक्ष राम बिहारी राठोड याला दोन अल्पवयीन मुलांना तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी अटक करण्यात आली. त्याच्या घरातून त्याचा लॅपटॉप, डिव्हिडी आणि हार्ड डिस्क जप्त करण्यात आली.
त्याच्या तपसाणीत सात अल्पवयीन मुले आणि दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या असलेल्या फिर्यादीवरच या मुलांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. दरम्यान, पोलिस अधिक्षक यश वीर सिंह यांनीही राठोड यांच्या घराची तपासणी केली.
राठोडने त्याचा सीसीटीव्ही आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर चोरीला गेल्याची फिर्याद काही दिवसांपुर्वी दिली होती. त्यावेळी ही चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी या डिव्हीआरची पाहणी करताना त्यात असलेले आक्षेपार्ह चित्रण आढळले. या चित्रिकरणाद्वारे तो या दोन लहान मुलांना ब्लॅकमेल करत होता.
राठोडच्या लॅपटॉप, डिव्हडी आणि हार्ड डिस्कमध्ये 15 ते 20 व्हिडिओमध्ये तो मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आढळून आले अहे. लहान मुलांना पैशाचे आमीष दाखवून तो त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत असे. त्यानंतर हे चित्रिकरण दाखवून त्यांना ब्लॅकमेल करत असे.