संक्रमणाच्या काळातील अस्थिर मानसिकता घातक (भाग-२)

संक्रमणाच्या काळातील अस्थिर मानसिकता घातक (भाग-१)

अनेक वेळा गुंतवणुकदार गुंतवणुकीचे नियोजन बाजारात काय घडत आहे, तसेच मित्र व नातेवाईक काय करत आहेत, विविध माध्यमांतून येणाऱ्या बातम्या काय सांगत असतात यावरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतात. अशा वेळी गुंतवणूक करण्यापूर्वी चे नियोजन पूर्णतः विसरून जातात.

गुंतवणूक करताना दाखवलेली ” दृढता व गंभीरता ” आपल्याला यशस्वी गुंतवणुकदार बनवत असतात. गुंतवणुकीचावेळोवेळी आढावा निश्चितपणे घेतला पाहिजे, परंतु केवळ छोट्या कालावधी मध्ये गुंतवणुकीत दिसत असलेले नुकसान किंवा कमी परतावा पाहून गुंतवणुकीतून बाहेर पडण्याच्या निर्णय अयोग्य ठरू शकतो, म्हणूनच गुंतवणुकीतील आपला अनुभव सुखद करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे.

गेल्या ५ वर्षातील उत्कृष्ठ परतावा देणाऱ्या काही योजना पुढील प्रमाणे….

* मिराई असेट इमर्जिंग ब्लूचीप फंड – १८.२२% (सरासरी ५ वर्षाचा परतावा)
* ऍक्सेस फोकस इक्विटी फंड – १६.९२% (सरासरी ५ वर्षाचा परतावा)
* सुंदरम लार्ज अँड मिड कॅप फंड – १५.८८% (सरासरी ५ वर्षाचा परतावा)
* एडलवाईज मल्टीकॅप फंड – १५.३०% (सरासरी ५ वर्षाचा परतावा)
* कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड – १३.४३% (सरासरी ५ वर्षाचा परतावा)

Leave A Reply

Your email address will not be published.