ब्रुकलीन येथील मैदानात स्वैर गोळीबार; 1 ठार 11 जखमी

न्यूयॉर्क – ब्रुकलीन येथील एका मैदानात झालेल्या गोळीबारामध्ये 1 जण ठार झाला तर अन्य्‌ 11 जण जखमी झाले. शनिवारी संध्याकाळी ब्रुकीनच्या पूर्वेकडील ब्राऊन्सव्हिला येथील एका मैदानामध्ये ही गोळीबाराची घटना घडली, असे ब्रुकलीनचे महापौर बिल दे ब्लासिनो यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

गोळीबारामध्ये 12 जण जखमी झाले आहेत, असे न्यूयॉर्क पोलिसांनी म्हटले आहेत. जखमींपैकी 38 वर्षीय गृहस्थाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या व्यक्‍तीला डोक्‍यामध्ये गोळी लागली होती, असे पोलिसांनी म्हटले आहे. मयत झालेल्या व्यक्‍तीची ओळख किंवा जखमी झालेल्या अन्य व्यक्‍तींच्या प्रकृतीबाबतचा तपशील पोलिसांच्या प्रवक्‍त्याकडून उपलब्ध होऊ शकला नाही.

आतापर्यंत या गोळीबार प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून संभाव्य संशयिताचे कोणतेही तपशीलही प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आलेले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.