सातारा – राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ओळखली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनपदी माजी खासदार स्वर्गवासी लक्ष्मण तात्या पाटील यांचे सुपुत्र नितीन लक्ष्मणराव पाटील यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सर्वानुमते झालेल्या बैठकीत नितीन लक्ष्मणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते सकाळपासूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा बँकेच्या आवारामध्ये उपस्थित होते. मात्र, झालेल्या या संचालकांच्या बैठकीमध्ये नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांचे नाव सर्वानुमते बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले.