नगर – महापालिकेच्या हद्दीत नगर-औरंगाबाद रस्त्यावर डीएसपी चौकात सार्वजनीक बांधकाम विभागाच्या आवारात अनाधिकृत फलक लावण्यात आले होते. याबाबत दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध करताच हे फलक उतरविण्यात आले. मात्र मनपाने संबंधितांवर काय कारवाई केली? तसेच संबंधितावर गुन्हा दाखल केला की नाही. याबाबत मैन पाळले जात आहे.
दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत वाढदिवसाचे फलक लावण्यात आले होते. त्या संबंधितावर मनपाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यानंतर शिवसेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्या जागेत कुठलीही परवानगी न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फलक लावले. व ते फलक उतरविण्यात आले.
मात्र त्याबाबत मनपा संबंधितांवर काय कारवाई करणार, का मनपा कारवाईत भेदभाव करते का याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.