आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुटीवर असलेल्या जवानांना प्रवासादरम्यान संसर्ग होण्याचा धोका कमी व्हावा, या हेतूने निमलष्करी दलांमधील अनावश्यक रजा रद्द करण्यात येत आहेत. या जवानांनी स्वतःबरोबर सार्वजनिक सुरक्षिततेची काळजी घेऊन साथीच्या काळातील आपत्कालिन कार्यासाठी तत्पर रहावे, असे सरकारी अदेशात म्हटले आहे.
या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रलयाच्या आरोग्य विभागकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा प्रसार आणि तपासणीसाठी पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत. या संदर्भात निष्काळजीपणामुळे देशाच्या अंतर्गत आणि सीमेवर सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या सुमारे 10 लाख सुरक्षा जवानांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे.
पदोन्नती, वैद्यकीय आढावा, क्रीडा स्पर्धा आणि भरतीसंबंधित सर्व बैठका आणि नियमित विभागीय आढावा बैठकाही पुढे ढकलण्याची सूचनाही करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस आणि सशत्र सीमा बाल, याशिवाय दहशतवाद विरोधी काउन्सिल नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि आसाम रायफल्सचा निमलष्करी दलांमध्ये समावेश आहे.