सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा नुकताच भीषण अपघात झाला. या अपघातात पीडिता गंभीर जखमी झाली असून सध्या ती कोमामध्ये गेली आहे. दरम्यान, तिच्यावर पुढील उपचार दिल्लीला करण्यात येणार होते परंतु, आता पीडितेवरील सर्व उपचार हे लखनऊमध्येच होणार आहेत. याविषयीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडितेच्या काकाची रायबरेलीच्या कारागृहातून दिल्लीच्या तिहार कारागृहात रवानगी करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पीडितेच्या वकिलांनी न्यायालयास सुरक्षेच्या कारणास्तव पीडितेचा इलाज लखनऊमध्येच करण्यात यावेत असे म्हटले होते. त्यानुसार न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.तसेच पीडिता आयसीयुमध्ये असून तिची स्थिती नाजूक आहे तसेच ती सध्या कोमात गेल्याने तिच्यावरील सर्व उपचार आता लखनऊमध्येच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवत असताना पीडितेच्या मेडिकल रिपोर्टवर सतत लक्ष ठेवण्यासही न्यायालयाने सांगितले. तर माध्यमांनी पीडितेची ओळख कोणत्याही परिस्थिती समोर न आणण्याचे आदेशही दिले आहेत.