नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिला व तिच्या कुटुंबियांचा नुकताच भीषण अपघात झाला,याच अपघातप्रकरणी भाजपचा आमदार कुलदीप सेंगर आणि अन्य नऊ जणांविरूद्ध सीबीआयने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सेंगर व अन्य नऊ जणांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनीही सोमवारी खुनाचा गुन्हा नोंदवला होता. हा अपघात नसून घातपात होता. पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट होता असा आरोप विरोधकांनी केल्यामुळे या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला. रायबरेलीमध्ये जिथे अपघात झाला त्या घटनास्थळालाही सीबीआय अधिकारी भेट देणार आहेत.