नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार आणि अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीयाने २० अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत केली आहे. यामध्ये एसपी, एएसपी, डीएसपी, निरीक्षक आणि उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सहा सदस्यांची सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीम ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी रवाना झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
गेल्या रविवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये या प्रकरणातील तरुणी आणि तिचे वकिल गंभीर जखमी झाले होते. या पाचव्या प्रकरणाचा तपास 7 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. रविवारच्या अपघातामध्ये अन्य दोघेजण मरण पावले होते.
CBI Spokesperson: CBI has constituted an additional special team of around 20 investigating officers including SP, ASP, DSP, inspector and sub-inspector level officers to assist in the case registered on July 30 related to the accident of #Unnao rape survivor and other offences. pic.twitter.com/cAguM30qFB
— ANI (@ANI) August 2, 2019