Unmesh Patil । लोकसभा निवडणुकीचा आता १ जून रोजी सातवा आणि शेवटचा टप्पा देशात पार पडणार आहे. ४ जून या दिवशी जनतेचा कौल नेमका कोणाकडे आहे हे समजणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. त्यातच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपावर धक्कादायक आरोप केलाय.
ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँग रुममध्ये Unmesh Patil ।
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रणा स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलीय. त्याठिकाणी २४ तास सुरक्षा दलांचा बंदोबस्तही तैनात आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. जळगाव येथे वखार महामंडळाच्या गोदामात ही स्ट्राँग रुम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही डिस्प्ले चार मिनिटं बंद झाला होता ज्यावरुन आरोप सुरु झाले आहेत. अशात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी ईव्हीएम वरुन भाजपावर आरोप केला आहे.
सीसीटीव्ही बंद होणं ही बाब संशयास्पद
उन्मेष पाटील यांनी, “भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी स्ट्राँग रुममध्ये फिरत आहेत. तसंच जनरेटर बॅक अप घेताना सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होणं ही बाब संशयास्पद आहे.” असा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद होण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत अशांवर कारवाई केली गेली पाहिजे असंही उन्मेष पाटील यांनी म्हटलं. त्याच बरोबर उन्मेष पाटील यांच्या आरोपांनीही खळबळ उडालीय.
६ मे च्या दिवशी काय घडलं? Unmesh Patil ।
दरम्यान. जळगवा आणि रावेर मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोन्ही मतदारसंघातले ईव्हीएम हे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहेत. २६ मे च्या दिवशी सकाळी ९ ते सकाळी ९ वाजून ४ मिनिटं अशी चार मिनिटं सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद झाला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र वीज पुरवठा खंडीत झाला होा त्यामुळे जनरेटर, इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करत असताना ही चार मिनिटं गेली आणि डिस्प्ले बंद झाला होता असं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. मात्र उन्मेष पाटील यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे.