लष्कर परिसरात विनामास्क कारवाई

20 पेक्षा अधिक नागरिकांकडून दंड वसूल

 

पुणे – करोना पार्श्‍वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत सुरक्षा नियम कठोरपणे राबवण्यावर भर दिला जात आहे. परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विनामास्क नागरिक, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक नागरिकांकडून दंड वसूल केला आहे.

शहरात फिरताना नागरिकांकडून अनेकदा सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहे. त्यातच आगामी काळात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक असल्याचेही सांगितले जात आहे. याच अनुषंगाने नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे, यासाठी बोर्डाने दंडात्मक कारवाईचा पवित्रा अवलंबला आहे. त्यानुसार लष्कर परिसरात ठिकठिकाणी विशेषत: गर्दीच्या ठिकाणी बोर्डाची सुरक्षापथके तैनात केली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.