भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांचे वादग्रस्त वक्तव्य
मुजफ्फरनगर : सतत आपल्या विधानांमुळे वाद ओढावून घेणारे भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर विवास्पद प्रतिक्रिया देत विक्रम सिंह सैनी यांनी देशातील मुस्लिमांना या निर्णयामुळे आनंद व्यक्त करायला हवा कारण आता त्यांना न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करता येणार आहे. इतकचं नाही तर भाजपाच्या अविवाहित युवा नेतेही काश्मीरला जाऊन प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असे विधान भाजपा आमदाराने केले आहे.
खतौली ( यूपी ) से BJP MLA विक्रम सिंह सैनी को #Article370 हटने का मतलब ये समझ आया है कि अब इनके कार्यकर्ता कश्मीर की गोरी लड़कियों से शादी कर पाएँगे। pic.twitter.com/MAXLhRq5KR
— Vinod Kapri (@vinodkapri) August 6, 2019
मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपाचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले. कठौली येथे कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते जमले होते. सैनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं.