नवी दिल्ली – देशभर सुरू असणारी रात्रीची संचारबंदी अनलॉक 3 मध्ये उठवण्यात आली. त्याचबरोबर जीम आणि योगा संस्था पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रमुख तरतुदी
- रात्रीची संचारबंदी रद्द
- योगा संस्था आणि जीम आदर्श आचार संहिता पाळून सुरू करण्यास मान्यता.
- सामाजिक अंतर पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास मान्यता.
- शाळा, महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंद.
- वंदे भारत मोहीमेपुरतीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी.
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील वगळता सर्व उद्योगांना परवानगी
वगळलेले उद्योग
- मेट्रो रेल्वे
- सीनेमा हॉल, स्वीमींग पूल
- मनोरंजन उद्याने
- थिएटर, बार
- प्रेक्षागृहे
- सामाजिक
- राजकीय
- क्रीडा
- मनोरंजन
- शैक्षणिक
- सांस्कृतिक
- धार्मिक मेळावे