प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात गुरु रंधावा गंभीर जखमी झाला आहे. गुरूचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, गुरु रंधावा आणि त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
कॅनडामधील क्वीन एलिझाबेथ थिएटरमध्ये गुरु रंधावा म्युझिकल कॉन्सर्टसाठी गेला होता. शो संपताच एका अज्ञात व्यक्तीने गुरु रंधावावर हल्ला चढविला.
दरम्यान, गुरुने “सूट सूट’, “हाय रेटेड गबरू’, “लाहोर’ आणि “बन जा तू मेरी राणी’ यासारखी हिटस् गाणी गायली आहेत. गुरु रंधावा याचे इंन्स्टाग्रामवर तब्बल 50 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरून गुरुच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल.