अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

पाटण तालुक्यातील धामणी येथील घटना

ढेबेवाडी- पाटण तालुक्यातील तळमावले-काळगाव मार्गावर धामणी या गावाजवळ सोमवारी पहाटे अज्ञात वाहनाने बिबट्यास धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभाग हा डोंगराळ व दुर्गम असा विभाग आहे, याठिकाणी जंगलाचे मोठे क्षेत्र असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा सर्रास वावर असतो. या विभागात बिबट्याची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे या भागात बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास तळमावले-काळगाव मार्गावर असणाऱ्या धामणी या गावाजवळ अज्ञात वाहनाची धडक बसल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाकडून संबंधित वाहनधारक कोण आहे. याचा शोध सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.