पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनाविभागातर्फे एकाच वेळी 16 हजार 661 विद्यार्थ्यांना कडुनिंबांची सर्वाधिक रोपे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची नोंद आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये अधिकृतरीत्या करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या वतीने “स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रांगणात 23 जून 2019 रोजी कडुनिंबांची रोपे वाटण्याचा जागतिक विक्रम करण्यात आला. विक्रम नोंदविण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच विद्यापीठाने जोरदार तयारी ठेवली होती. अखेर त्यात विद्यापीठाला यश मिळाले आहे.