पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ शुक्रवारी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११५ वा पदवीप्रदान समारंभ शुक्रवार, दि. २१ जून २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख आतिथी म्हणून मा. डॉ. बैरत्राँ द हार्टिंग (भारतातील फ्रेंच दूतावासातील अधिकारी) हे उपस्थित राहणार आहेत. ते स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतील.

सन २०१७-१८ मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ६२१२ विद्यार्थ्यांना विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात येणार आहेत. यापैकी १२७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीची प्रमाणपत्रे व ६ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.

पदवी प्रमाणपत्रांचे वितरण २१ जून २०१९ रोजी विद्यापीठ परिसरातील प्रशासन भवनाजवळ परीक्षा भवनामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत केले जाणार आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे पदवी प्रदान कार्यक्रमानंतर लगेचच संबंधित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पाठवण्यात येतील.

पदव्यांचा तपशील पुढीलप्रमाणे –

पदवी (Graduate) : ३९६५

पदव्युत्तर पदवी (Post-graduate) : १९९५

पीएच.डी. (Ph.D.) : ०१२७

पदव्युत्तर पदविका (P.G. Diploma)  : ००२९

एम.फिल. (M.Phil) : ००६४

पदविका (Diploma) : ००३२

विद्याशाखांनुसार तपशील –

विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology)  : ३१५४

वाणिज्य व व्यवस्थापन (Commerce & Management) : १६९८

मानव्यशाखा (Humanities) : १०९२

विद्याशाखांतर्गत (Interdisciplinary) :  ०२६८

प्रमुख पाहुण्यांचे नाव व माहिती –

डॉ. बैरत्राँ द हार्टिंग
(भारतातील फ्रेंच दूतावासात ‘शिक्षण, विज्ञान व संस्कृती’ या विषयांसाठीचे ‘काउन्सिलर’ आणि भारतातील “फ्रेंच इन्स्टिट्यूट”चे संचालक)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here