मुंबई विद्यापीठाच्या “आयडॉल’ला यूजीसी मान्यता

40 हजार विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई – मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली आहे. यावर्षीची जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. आयडॉलच्या 15 अभ्याक्रमास 2019-20 साठी युजीसीने मान्यता दिली आहे. त्यामुळे 35 ते 40 हजार विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे. या अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

यूजीसीने भारतातील दूर व मुक्त शिक्षणासाठी 2017 साली नवीन नियमावली लागू केली. या नियमावलीनुसार भारतातील दूर व मुक्त शिक्षण देणाऱ्या संस्थासाठी “नॅक’ असणे अनिवार्य केले होते. मुंबई विद्यापीठाबरोबरच भारतातील अनेक विद्यापीठे “‘नॅक’ची कार्यवाही करत असल्याने व प्रथमच दूरशिक्षणासाठी ही नियमावली लागू केल्याने यूजीसीने या नियमावलीत बदल केला. “नॅक’ची अट दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठासाठी शिथील करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेची पाहणी करण्यासाठी यूजीसीने तज्ज्ञ समितीची स्थापना केली. या तज्ज्ञ समितीने मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलला भेट देऊन पाहणी केली. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाशी चर्चा केली आणि आपला अहवाल यूजीसीला सादर केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.