नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक देशांच्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या भारतात पुन्हा एकदा कोरोनाने बाधित होणार्या लोकांची संख्या वाढत आहे.
मात्र त्याचबरोबर देशभरात लसीकरणाची मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. तसेच आता भारताने जमैकाला वॅक्सीन दान केले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने या बद्दल भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे याचे आभार मानले आहे.
Jamaican cricketer Chris Gayle thanks India for sending COVID19 vaccines to Jamaica
"PM Modi, the Government of India and the people of India, I want to thank you all for your donation of the vaccine to Jamaica. We appreciate it," he says pic.twitter.com/8iSa3yhYcs
— ANI (@ANI) March 19, 2021
भारत सरकारने जमैकाला कोव्हिड – 19 चे वॅक्सीन दान केले आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल भारत सरकारचे आभार मानत असतानाचा एक व्हिडिओ, एएनआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत ख्रिस गेल जमैकाला कोव्हिड – 19 चे वॅक्सीन दान केल्यामुळे आभार मानताना म्हणत आहे की, “पंतप्रधान, भारत सरकार आणि भारतीय लोक या सर्वांचे जमैकाला कोव्हिड -19 चे वॅक्सीन दान करण्यासाठी धन्यावाद. भारत, तुम्हाला लवकरचं भेटेल. तुम्हाला प्रेम आणि खूप खूप धन्यवाद.”
ख्रिस गेल हा आयपीएल स्पर्धेत सध्या पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत 132 सामने खेळताना 4772 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतक आणि 31 अर्धशतके लगावली आहेत. त्याची 175 धावांची सर्वच खेळी आहे. त्याचबरोबर आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.