महाभियोगाच्या नियमांना अमेरिकेच्या संसदेची मंजूरी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाच्या प्रक्रियेसाठी डेमोक्रॅटिक पक्षाने तयार केलेल्या नियमांना अमेरिकेच्या संसदेमध्ये मंजूरी देण्यात आली. तीव्र मतभेदांनंतर झालेल्या मतदानामध्ये नियमांच्या बाजूने 232 तर विरोधात 196 मते पडली.

या प्रक्रियेनुसार साक्षीदारांच्या बंद खोलीत मुलाखती, सार्वजनिक समितीची सुनावणी आणि सभागृहाने ट्रम्प यांना काढून टाकण्याची शिफारस करावी की नाही यावर मत दिले जाईल, अशी प्रक्रिया निश्‍चित करण्यात आली आहे. सर्व रिपब्लिकन मतदारांनी पॅकेजला विरोध केला तर दोन सदस्य वगळता प्रत्येक मतदान करणाऱ्या डेमोक्रॅटने त्याचे समर्थन केले.

“रिपब्लिकन सदस्यांनी एकत्र येऊन त्यांच्या पक्षाच्या नेत्याला या धोक्‍यांपासून बचाव करण्याची वेळ आता आली आहे.’ असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. यातूनच यांच्यावर दबाव खूप वाढला असल्याचे स्पष्ट झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.