नवी दिल्ली -कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिक आपल्या घरामध्ये कैद झाले असून, वर्क फ्रॉम होम करत आहेत. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात. फेस मास्क लावणे आणि आपले हात धुवाने हे सर्व आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे.
कोरोनाच्या या काळात नागरिक आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार मास्क तयार करत आहे. आता जपानच्या एका स्टार्टअपने तंत्रज्ञानाचा वापर करत थेट स्मार्ट मास्क तयार केले आहे. हा मास्क इंटरनेटशी कनेक्ट होतो. हा मास्क फोनवर आलेले मेसेज देखील तुम्हाला वाचून दाखवेल. याशिवाय मास्क जपानी भाषेचे 8 विविध भाषेत भाषांतर करण्यास सक्षम आहे.
डोनट रोबोटिक्स नावाच्या कंपनीने या मास्कची निर्मिती केली असून, या खास मास्कला कंपनीने ‘सी-मास्क’ नाव दिले आहे. हा मास्क स्मार्टफोनच्या ब्लूटूथशी कनेक्ट राहील व मोबाईल अॅपद्वारे ऑपरेट होईल.