अनोखे संशोधन: हवेतून पाणी निर्माण करणारा यंत्रमानव; वाळवंटात ठरणार वरदान

कैरो : ईजिप्तमधील एका अभियंत्याने अनोख्या अशा यंत्रमानवाचा शोध लावला असून हा यंत्रमानव हवेतून पाण्याची निर्मिती करत आहे.  वाळवंटासारख्या प्रदेशांमध्ये हे संशोधन वरदान ठरणार आहे.  महमूद कोमी या 28 वर्षे अभियंत्याने या यंत्रमानवाचा शोध लावला असून या यंत्रमानवाचे नाव त्याने ईलू असे ठेवले आहे.

मंगळसारख्या ग्रहावरही वातावरणातील आर्द्रता शोषून हा यंत्रमानव पाण्याची निर्मिती करू शकतो असा दावा या अभियंत्याने केला आहे.  आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात करण्यात आला असून रिमोटच्या सहाय्याने या यंत्रमानवावर नियंत्रण ठेवता येते.  या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी तयार करण्याचा खर्च अत्यंत कमी असून हे एक महत्त्वाचे संशोधन मानले जाण्याची शक्यता आहे.

वातावरणातील आर्द्रतेचा वापर करून पाणी तयार करण्याची सध्याची जी यंत्रणा आहे. ती अतिशय खर्चिक आहेत. त्याला योग्य पर्याय म्हणून आता या यंत्रमानवाचा तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. 5000 लिटर शुद्ध पाणी तयार करतील इतके यंत्रमानव मी निर्माण करू शकतो असा दावा या अभियंत्याने केला आहे. या अभियंत्याला हा यंत्रमानव तयार करण्यासाठी नऊ महिन्याचा कालावधी लागला असून एक यंत्रमानव तयार करायला अठरा हजार रुपये खर्च आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.