कोल्हापुरात गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा; ओंकार पाटीलने केला विक्रम

कोल्हापूर – कोल्हापूरातील गिरगावमध्ये दसऱ्यानिमित्त गुंडी उचलण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. 100 किलो वजनाचा गोलाकार दगड जमिनीवरून वर उचलून तो मांडीवरून खांद्यावर न थांबता जो जास्त वेळा वर-खाली करेल त्याला या स्पर्धेत गुंडी सम्राट किताब देऊन गौरविण्यात येते.

अंगाचा तोल सावरत सुरू असलेला स्पर्धकचा थरार पाहता अनेकांचा पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. अवघे 19 वय असलेल्या ओंकार रामचंद्र पाटील याने तब्बल 13 वेळ गुंडी वर खाली करत या स्पर्धेत विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.