नगर -नगर शहातील प्रख्यात आर्टिस्ट आणि ब्रॅंड कन्सल्टन्ट ज्ञानेश शिंदे यांच्या पुढाकारातून अहमदनगर ब्रॅंडिंग ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म संकल्पना नगरकांच्या पसंतीस उतरली आहे. अहमदनगरमधील चांगल्या गोष्टी जगभर पोहोचवणे, हा बॅंडींगचा मुख्य उद्देश असल्याची भूमिका आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे यांनी मांडली.
नगरमधील ऐतिहासिक वास्तू, पर्यटनस्थळं, प्रभावी आणि येथील प्रेरणादायी माणसं, कला आणि कलाकार, नावीन्यपूर्ण आणि लक्षवेधी गोष्टी, चांगले कार्यक्रम, विविध उपक्रमांना आर्टीस्ट शिंदे यांच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळाले. नगरच्या विशेष गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचत आहेत. या संकल्पनेमुळे केवळ अहमदनगर शहरचेच नव्हे;तर संपूर्ण जिल्ह्याचे ब्रॅंडिंग होत आहे.
नगरमध्ये काय आहे? याप्रश्नांची जागा आता नगरमध्ये हे पण आहे? या सुखद प्रश्नाने घेतली आहे. नगरमधील विविध ठिकाणे, प्रभावी व्यक्ती आणि अभिमान वाटावा अशा गोष्टी मुद्देसूद माहितीसह अहमदनगर ब्रॅंडिंगच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम, अशा सोशल मीडिया पेजवर झळकत आहेत. त्यासोबत अनेकजण या चळवळीत सहभागी देखील झाले आहेत. बाहेरील पर्यटकांना आकर्षित करावे, सर्वांना प्रेरणा मिळावी, यासाठी अहमदनगर ब्रॅंडिंगचा चांगला उपयोग होत आहे. स्वतः उत्तम आर्टिस्ट आणि ब्रॅंड कन्सल्टन्ट असल्याने ज्ञानेश शिंदे यांनी ही संकल्पना अतिशय सुंदर, कलात्मक आणि भावणाऱ्या शब्दांची जोड देत साकारली.
गेल्या दीड-दोन वर्षांपासून यथाशक्ती काम सुरु असलेल्या या अहमदनगर ब्रॅंडिंगचा प्रवास आणि परिवार दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावर जवळ-जवळ 25 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. केवळ इतकेच नव्हे तर ऑफलाईन सुध्दा विविध लोकांच्या भेटी घेऊन, त्यांचे विचार, कर्तृत्व जगासमोर आणण्याचे काम देखील सुरु असल्याचे शिंदे म्हणाले. करोनाच्या संकटकाळात अहमदनगर ब्रॅंडिंगने जनजागृती मोहीम केली. त्यातून नगरकरांना प्रेरणा आणि उपयुक्त संदेश मिळाले. सकारात्मक विचार मिळाले. शहराविषयी बोलताना शिंदे म्हणतात की, “जे आपल्याकडे नाहीये त्याच्यासाठी दुःख न करता, जे आपल्याकडे आहे त्याचा विचार केल्यास आपण आनंदी होऊ.