लासलगाव : राज्यात दिवसागणिक रोज करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन त्याच्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र सध्या कोरोनाला थोपवण्यासाठी एका गावातल्या गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ती शक्कल म्हणजे चक्क कोरोनाच्या लग्नाची पत्रिका छापण्यात आली आहे. याच लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या येवल्यातील अभिनव फाउंडेशन ने ही लग्न पत्रिका छापली आहे.
कोरोना विषाणूची राज्यात दुसरी लाट आली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, त्यातच गावोगावी लग्नसोहळ्याची धूम सुरु असून त्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे राज्य सरकार सतर्क झालेला आहे. विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण व्हावी यासाठी येवला येथील अभिनव फाउंडेशनच्या वतीने एक अंकोझी शक्कल लढवली आहे. त्यासाठी लग्न पत्रिका तयार करण्यात आली आहे.
पत्रिकेची सुरुवातच यमराजाचे चित्र आणि यमराज प्रसन्न कशी करत सुरुवातीला यमराजाची कृपा होण्याच्या आधीच हा घातक विषाणू भारतातून हाकलून लावण्याचे आहवान या पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कोरोना विषाणू हा चीनमधून आल्याने चीनचा दत्तक पुत्र चि. कोरोना तर मृत्युमुखी पडल्यानंतर यमराज घेऊन जातात म्हणून चि.सौ.कां मृत्यूबाई त्यांच्या, संसर्गजन्य शुभ विवाहाची आमंत्रण पत्रिकेतून तुम्ही घरीच राहावा हा संदेश पत्रिका जुळणाऱ्या चपखलपणे देत नम्र विनंती करण्यात आली आहे.
ती अशी की…
जा जा… पत्रिका मार भरारी, जाऊन सांग सोयऱ्यांच्या घरी,
विषाणू संसर्ग फार आहे जहरी, सर्वजण रहा आप-आपल्या घरी…
तरी आपण सहकुटुंब सहपरिवार घरातच राहावे ही नम्र विनंती
आपले विनीत…
आरोग्य विभाग, केंद्र सरकार भारत
आरोग्य विभाग, राज्य सरकार महाराष्ट्र
वरील विनंतीस मान देऊन घरात राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती,
समस्त जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र (Corona Wedding Invitation Card)
विवाह मुहूर्त…
संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्या आल्या लगेच
विवाहस्थळ…
सर्व गर्दीच्या जागा
आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हा…
चि. ताप, चि. खोकला, कु. सर्दी, कु. महामारी
सर्वच लग्नपत्रिकेत एक टीप असते, ती म्हणजे आहेर आणू. नका मात्र यात आगळीवेगळी अशी टीप आवर्जून घातलीय आहे की ती…
टीप – प्रत्येकाने शुभ आरोग्यासाठी मास्क व सानिटायझर वापरणे तसेच आपापसात दोन मीटर अंतर ठेव