सांगवीतील शिवप्रेमींचे अनोखे अभिवादन

-वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी
-50 किलोमीटर पावनखिंड मार्गाचे पदभ्रमण

सांगवी  – वीर शिवा काशिद व बाजी प्रभू देशपांडे याच्या पुण्यतिथीचे निमित्त सांगवी सिंहगड ट्रेकर्स ग्रुपने पन्हाळगड ते विशालगड हा पावन खिंड मार्ग 50 किलोमीटर
पदभ्रमण केले.

सांगवीतील शिवप्रेमी चंद्रकांत शिंदे, आनंद लंगे, क्षितिज कदम, विजय गुल्हाने, पुरुषोत्तम जयसिंगकार, सुभाष चुटे, राहुल मुळूक, अजय शितोळे, अशोक नलवडे, बाप्पा राऊत या 50 ते 63 वयोगटातील शिवप्रेमींचा या पदभ्रमणामध्ये समावेश होता. या सर्व शिवप्रेमींनी 13 जुलैला सकाळी वीर शिवा कशिद समाधीला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पदभ्रमण करीत माळेवाडी या गावी मुक्काम केला. दि. 14 जुलै रोजी 7 वाजता पुन्हा पदभ्रमंतीला सुरुवात केली व दुपारी दोन वाजता ते पावन खिंडला पोहचले. तेथील वीर बाजीप्रभू देशपांडे स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नंतर विशाल गडाकडे कूच केली. दुपारी 4 वाजता विशाल गडावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचे दर्शन घेत परतीची वाट धरली, अशी माहिती चंद्रकांत शिंदे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)