नवी दिल्ली- करोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांच्यासाठी देखील महत्चाची घोषणा यंदाच्या करण्यात आली आहे.
‘PM eVIDYA’ मधील वन क्लास वन टीव्ही चॅनेल योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या 12 वरुन 200 पर्यंत वाढवण्यात येईल.
प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर करण्यात येईल असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
डिजीटल विद्यापीठ सुरु करणार असून डिजीटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरु होणार. डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार असेही त्यांनी सांगितले.