नवी दिल्ली – केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचं आज निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचा कोरोनाविरोधातील लढा आज (बुधवारी) अपयशी ठरला.
अंगडी यांनी ११ सप्टेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कोरोना बाधा झाल्याची माहिती दिली होती. ट्विटद्वारे त्यांनी, आपली प्रकृती ठीक असल्याचंही सांगितलं होत. मात्र उपचारांदरम्यान आज त्यांचे निधन झाल्याचे एम्स रुग्णालयातर्फे जाहीर करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केलं दुःख
अगदी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे, “सुरेश अंगडी हे पक्षाचे एक असे अपवादात्मक कार्यकर्ते होते, ज्यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला मजबूत करण्यासाठी कडक मेहनत घेतली. ते एक समर्पित खासदार आणि प्रभावशाली मंत्री होते. त्याचं निधन झालं ही दुःखद घटना आहे.” असा संदेश दिला.
Suresh Angadi was a dedicated MP and effective minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour, tweets Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/55obcBwdrU
— ANI (@ANI) September 23, 2020