मुंबई – आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता नेहमीच सोशलवर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात.
माझी सुद्धा होती आई
नाव तिचं होतं हौसाबाई
पण तिने जाण्याची केली घाई
आईची आठवण येते ठाई ठाई— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 16, 2021
यापूर्वी, कोरोनाविरोधात रामदास आठवले यांनी चक्क घोषणा दिल्या होत्या. आठवले यांनी भारत-चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हणत ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा दिल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आठवले यांच्या कविता या नेहमीच मिश्कील आणि मजेशीर असतात. संसदेत कित्येक वेळा आठवले यांच्या कवितांनी नरेंद्र मोदींसह इतर बड्या नेत्यांना आपल्या हसू आवरता आलं नाही. मात्र यावेळी त्यांची त्यांच्या आईची आठवण आल्याने भावूक होऊन त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक कविता शेअर केली आहे.
रामदास आठवले यांनी यांनी आईच्या आठवणीत सादर केलेली कविता
माझी सुद्धा होती आई,
नाव तिचं होतं हौसाबाई,
पण तिने जाण्याची केली घाई,
आईची आठवण येते ठाई ठाई!
दरम्यान, रामदास आठवले यांना यापूर्वी त्यांच्या कवितांमुळे अनेकांनी ट्रोल केलं आहे. मात्र आईच्या आठवणीत सादर केलेल्या कवितामुळे त्यांची कवितेची दुसरीही एक बाजू जगासमोर आली आहे.