नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भारत हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. सर्व जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीकडे आहे. सर्वांना मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती मी करतो, असे नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
Maharashtra: Union Minister Nitin Gadkari cast his vote at polling booth number 220 in Nagpur parliamentary constituency #LokSabhaElections2019 pic.twitter.com/hSrlIySwUV
— ANI (@ANI) April 11, 2019