कर्नाटकातील विजयपुरा येथे केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांच्या कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. निरंजन ज्योती आणि त्यांच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रकचा चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ट्रक पलटी झाला, त्यामुळे मंत्र्यांच्या गाडीच्या पुढील भागाला मोठा फटका बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाची चूक होती. निरंजन ज्योती यांच्या कारला धडक देणारा ट्रक लोखंडी रॉडने भरलेला होता आणि कारला धडकताच तो पलटी झाला. या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कारच्या बोनेटला मोठा फटका बसला आहे.