नवी दिल्ली – केंद्र सरकारने जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित संघटनेचा कमांडर आशिक अहमद नेंगरू याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील विविध दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचा आरोप आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आशिक अहमद नेंगरू हा जैश-ए-मोहम्मद चा एक भयानक दहशतवादी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीमध्ये नेंगरूचा हात आहे. यासोबतच केंद्रशासित प्रदेशात विविध दहशतवादी घटना घडवून आणण्यास आशिक अहमद नेंगरू जबाबदार आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, नेंगरूमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन आणि त्याला दहशतवादी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी, त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 (1967 चा 37) च्या तरतुदींनुसार दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, नेंगरू काश्मीरमध्ये दहशतवादी सिंडिकेट चालवत आहे. तो जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याच्या धोकादायक मोहिमेत गुंतला आहे, ज्यावर पाकिस्तानचे नियंत्रण आहे. विशेष म्हणजे पुलवामा हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.