नवी दिल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर रेड्डी बुधवारी सकाळी प्रथमच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. रेड्डी विविध विकासकामांना सुरवात करतील.
यावेळी रेड्डी श्रीनगर आणि काश्मीरच्या ग्रामीण भागाला भेट देतील. यावेळी ते भागातील विविध विकासकामांचा आढावा घेतील आणि केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेतील.